सांगलीत शंभर रुपयांच्या स्क्रीन गार्डसाठी खून !

कोल्हापूर –
सांगलीत भरदिवसा शंभर रुपयांचे स्क्रीन गार्ड पन्नास रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाचा निघृण खून करण्यात आला. सदर घटना सांगली शहरातील बस स्थानकजवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानात घडली. स्क्रीन गार्ड देण्याच्या वादातून चौघा तरुणांनी चाकू आणि कोयात्याने सपासप वार करत खून केला. खुनाची घटना ही  दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

 

 

विपुल अमृत पुरी गोस्वामी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधिकक्ष रितू खोखर,
उपविभागीय अधिकारी विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काहीच तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतले. दरम्यान घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी झाली होती.