भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

कोल्हापूर  :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने  कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते अग्निशमन विभागाकडील जवान व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

           

 

 

 

यामध्ये फुलेवाडी 4 था बस स्टॉप येथील घराला लागेल्या आगीमध्ये दोन वयवृध्द महिलांना सुखरुप बाहेर काढून आग आटोक्यात आणल्याबद्दल वाहनचालक सतीश यादव, दत्तात्रय जाधव, तांडेल भगवान शिंगाडे, सर्जेराव लोहार, किसन पवार, फारमन चेतन जानवेकर, सुरेंद्र जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला. सिध्दार्थनगर येथे राहत्या घरावर झाड पडले होते. त्यामध्ये एक व्यक्ति आडकलेने त्यांना फायरमन मेहबुब जमादार यांनी बाहेर काढलेबद्दल, गांधीनगरमध्ये कटलरी गोडावूनला लागलेल्या आगीवर पाणी फायरींग करत असताना वाहनचालक यांच्या हातावर काच पडून जखमी होऊन सुध्दा आग आटोक्यात आणलेबद्दल व अहमदाबादमध्ये झालेल्या ऑल इंडिया फायर गेम्समध्ये फायरमन संभाजी ढेपले यांनी गोळाफेकमध्ये 358 कर्मचाऱ्यांमधून सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत  अभियान (नागरी) अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे उत्कृष्ट व प्रामाणिक काम केलेबद्दल सुवर्णा राजाराम कांबळे व राकेश रविंद्र पाटोळे यांचाही प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  

यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहा.आयुक्त नेहा आकोडे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळशहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्रे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, आर के पाटील, सुरेश पाटील, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, कामगार अधिकारी राम काटकरपशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसेरवका अधिकारी प्रशांत पंडतविधी अधिकारी संदीप तायडेमाजी नगरसेवक ईश्वर परमारमुख्याध्यापिका सौ.अंजली जाधवराजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनीअग्निशमन दलाचे जवानअधिकारीकर्मचारीनागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545