महावीर उद्यानामध्ये दुर्मिळ वृक्षांना नेमप्लेट

कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महावीर उद्यानामध्ये प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते दुर्मिळ वृक्षांना नेमप्लेट लावण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपआयुक्त पंडीत पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, वृक्षप्राधिकरण समिती सदस्य उदय गायकवाड, मधुकर बाचुळकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सहा.उद्यान अधिक्षक राम चव्हाण व उद्यान विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

 

 

  शहरामध्ये विविध ठिकाणी असणाऱ्या अतिदुर्मिळ, दुर्मिळ व वारसा वृक्षांची माहिती सर्व नागरिकांना सहजरित्या कळावी या उद्देशाने उद्यान विभागामार्फत वृक्षांना नामफलक लावणे या मोहिमेचा शुभारंभ आज करण्यात आला. या नाम फलकात वृक्षाचे शास्त्रीय नाव, स्थानिक नाव यासोबत क्युआर कोड यांचा समावेश असून नागरिकांनी भ्रमणध्वनीवरुन क्युआर कोड स्कॅन केल्यास या वृक्षाबद्दलची संपुर्ण माहिती उदा. प्रजात, शास्त्रीय नाव व वृक्षांचे महत्व, छायाचित्रे अशी सर्व माहिती मिळणार आहे. या वृक्षांची दुर्मिळ अतिदुर्मिळ माहितीबाबत वृक्ष प्राधिकरण सदस्यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सध्या महापालिकेमार्फत वृक्षगणनेचे काम सुरु असून यामध्येही वृक्षांची जात प्रजात शास्त्रीय नांव यांची नोंद ठेवण्यात येणार आहे.

🤙 9921334545