पन्हाळा – दख्खन महोत्सवात आनंदा भोसले यांना “यशस्वी समाजभुषण ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यशस्वी फौंडेशनच्या वतीने समाजातील अतुलनीय योगदान,सेवाभावी वृत्ती , उत्कृष्ट सामाजिक शैक्षणिक /पर्यावरण / वैद्यकीय / धार्मिक कार्याचा गौरव म्हणुन हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर,
यशस्वी फौंडेशनच्या अध्यक्षा विनिताताई पाटील , आमदार चंद्रदिप नरके , डाँ. जयंत पाटील , बाबासाहेब पाटील आसुर्लेकर , भारत पाटील ( आप्पा ) अमरसिंह पाटील उपस्थित होते …
आपल्या सामाजिक कार्यांची दखल घेऊन गौरव केल्याबद्दल आनंदा भोसले यांनी यशस्वी फौंडेशन व टीमचे मनस्वी आभार मानले.
यावेळी आनंदा भोसले म्हणाले ,मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नसुन आपल्या सर्वांचा सन्मान आहे . आपल्या सर्वांचे आर्शीवाद , ग्रामपंचायत सर्व सहकारी , वरेवाडी /कुंभारवाडी गावातील सर्व ग्रामस्थ व आपण सर्व हितचितकांचे मनापासून आभार .