रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग भू संपादन विषयी बैठक

कुंभोज (विनोद शिंगे)
जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री मा नामदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग भू संपादनविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

 

यावेळी मागील भूसंपादन प्रक्रियेप्रमाणे चार पट भरपाई शेतकऱ्यांना मिळावी याबाबत NHAI च्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली.शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला चार पट भरपाई मिळविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे ठरले.

यावेळी खासदार धैर्यशील माने,दलितमित्र आमदार डॉ अशोकराव माने,माजी खासदार संजय मंडलिक,आमदार चंद्रदीप नरके यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.