कोल्हापूर : कोल्हापूर एच.पी.व्ही. व्हॅक्सीनेशन कॅम्पचे उद्घाटनमेडिकल असोसिएशन कोल्हापूर यांच्यावतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री पदी निवड झाल्याबद्दल हसन मुश्रीफ व महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नामदार प्रकाशआबिटकर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. राधीका जोशी यांच्या फौंडेशनच्यावतीने ५०० मुलींच्यासाठी एच.पी.व्ही. व्हॅक्सीनेशन कॅम्पचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. शितल देसाई, डॉ. अरुण धुमाळे, डॉ. राधीका जोशी, डॉ. निपूर खरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.