मंत्री प्रकाश आबीटकरांनी महानेट अंतर्गत सुरू असलेल्या कामांची तपासणी करण्याच्या दिल्या सूचना

कोल्हापूर : महानेट अंतर्गत ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या कामांचा आढावा घेणेसाठी मंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित कंपनीचे अधिकारी यांच्यासमवेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

 

 

 

आबीटकरांनी महानेट अंतर्गत सुरू असलेल्या कामांची तपासणी करून त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामांमध्ये किती रस्ते पुर्ववत केले. तसेच संबंधित यंत्रणेची मंजुरी घेतली का याची चौकशी करण्याच्या सूचना केल्या.

केंद्र सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या भारतनेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात महानेट प्रकल्प उभारण्यात येत असून त्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. आपणाला प्रकल्प हवाच आहे आणि याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. परंतु महानेट हे काम करीत असताना दळणवळणाचे दुसरे महत्त्वाचे साधन मोडकळीस आणत आहेत. प्रक्रियेचा अवलंब न करता चांगले रस्ते खोदून ते पुर्ववत न करता कामे करीत आहे. महानेटने केलेल्या खोदाईमुळे व त्यानंतर ते रस्ते पूर्ववत न केल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. काही वेळा यामुळे अपघातही होत असतात. त्यामुळे आत्तापर्यंत केलेल्या कामांमध्ये त्या त्या ठिकाणी रस्ते पूर्ववत केले किंवा नाही याची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करावी.

यामध्ये सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद यांनी तयार केलेले रस्ते खोदण्याबाबत आवश्यक मंजुरी घेणे अपेक्षित आहे. शासनाच्या नियमावलीनुसार महानेटकडून कार्यवाही व्हावी ही अपेक्षा आहे. सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा मिळावी हा सर्वांचाच उद्देश आहे. परंतु हे काम करीत असताना चांगले रस्ते, चांगल्या सोयी सुविधांची पुन्हा तोडफोड करू नये, नियमावली पाहून महा नेटने काम करावे असे सांगितले.

महानेट कडून कामकाज करीत असताना कोणतेही यापूर्वी उभारलेले काम खराब होता कामा नये, चुकीच्या प्रक्रियेने काम करणाऱ्या यंत्रणेवर गुन्हे दाखल करावेत. महा नेटची कामे तर झालीच पाहिजेत पण ती प्रक्रियेनुसार करा. तालुक्यात काम सुरू करण्यापूर्वी त्या त्या यंत्रणेकडून मंजुरी घ्या. काम झाल्यानंतर उकरलेले रस्ते पुन्हा पूर्ववत केल्याचे प्रमाणपत्र घ्या. तसेच आज पासून कोणतेही काम पूर्वपरवानगीशिवाय सुरू करू नये. या कामाबाबत परवानगी घेत असताना संबंधित यंत्रणेने दिलेल्या सूचनेनुसार व सुचवलेल्या ठिकाणीच खोदकाम करून कामे पूर्ण करावीत असे निर्देशही दिले.

🤙 8080365706