कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील माता-भगिनींच्या अलोट गर्दीत गडमुडशिंगी इथल्या यशवंत मंगल कार्यालयामध्ये हळदीकुंकू समारंभ पार पडला. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला मतदारसंघातील हजारो महिला उपस्थित होत्या.
या लाडक्या बहिणींची माया आणि आशीर्वाद अमल महाडिक साहेबांच्या पाठीशी होते म्हणूनच त्यांचा विजय निश्चित होता अशा शब्दात चित्राताईंनीही आपल्या भावना मांडल्या.
यावेळी शौमिका महाडिक , महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती पाटील, ग्रामीण पश्चिमच्या जिल्हाध्यक्ष अनिता चौगुले, ग्रामीण पूर्वच्या जिल्हाध्यक्ष पुष्पाताई पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष रुपाराणी निकम यांच्यासह भाजपा महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या.