दालमिया शुगर उत्कृष्ट तांत्रिक पुरस्काराने सन्मानित 

 

पांडुरंग फिरींगे

कोल्हापूर:
आसुर्ले पोर्ले ता पन्हाळा येथील श्री दत्त दालमिया साखर कारखान्याला व्ही.एस.आय. पुणे यांचेकडून उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार कारखाना युनिट हेड एस रंगाप्रसाद यांनी स्विकारला.

 

 

 

 

वसंतदादा शुगर इंस्टिट्यूट, पुणे यांच्याकडून सन २०२३-२४ मध्ये पार पडलेल्या गळीत हंगामामधील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या साखर कारखान्यांना तसेच अधिकारी व शेतकरी यांना पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये आसुर्ले-पोर्ले येथील श्री दत्त दालमिया भारत शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्यास दक्षिण विभागात उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.गुरुवार दि. २३ जानेवारी २०२५ रोजी (मांजरी) पुणे येथील व्ही.एस.आय. च्या कार्यस्थळावर या पुरस्कारांचे वितरण खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार शरद पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाम. अजितदादा पवार, सहकार मंत्री नाम. बाबासाहेब पाटील, दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून, दालमिया भारत शुगर इंडस्ट्रीज, आसुर्ले-पोर्लेचे यूनिट हेड एस. रंगाप्रसाद, एच आर हेड सुहास गुडाळे, इंजिनीअरिंग हेड शिवप्रसाद पडवळ, प्रोसेस हेड कनगसबाई, यांनी पुरस्कार स्विकारला.सदरचा पुरस्कार मिळाला हा ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांच्या कष्टाने मिळाला असल्याचे युनिट हेड एस रंगाप्रसाद यांनी सांगितले.