कोल्हापूर –
उपरोक्त संदर्भिय विषयी सय्यद रफिक पेडगावकर, परभणी जिल्हाध्यक्ष यांनी याकार्यालयात निवेदन सादर केले असून, देशासह राज्यात कॅन्सर सारख्या आजाराचे प्रमाण जास्त
वाढत आहे.
या आजाराना कारणीभुत ठरत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर बंदीचे आदेश निर्गमित करण्यात यावे. परभणी जिल्हयात चहाच्या कागदी कणंचा उपयोग अधिक प्रमाणात केला
जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्याअर्थी चहाचे कागदी कप बनवितांना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा उपयोग केला जातो कागदी कपात गरम चहा टाकल्यावर कपाच्या आतील
मायक्रो प्लास्टिकचे कण वितळते व प्लास्टिकचे कण पोटात जातात. त्यामुळे कॅन्सर सारखा आजार होउ शकतो असे नमूद आहे.
यावेळी बंडा लोंढे राजेंद्र माळवी पाटील, विक्रम महादेव पाटील,सुहास रामचंद्र पाटील, महमदारिफ काझी,योगेश कांबळे,प्रमोद डोंगरे,अक्षय साळवी,राहुल गणेशाचार्य आदी उपस्थित होते.