गारगोटी:
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी भुदरगड तालुका शिवसेनेच्या वतीने गारगोटी येथील पक्ष कार्यालयात अभिवादन केले. यावेळी बिद्री कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय उगले व शिवसेना तालुकाप्रमुख संग्रामसिंह सावंत यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना संग्राम सावंत म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्व फक्त शब्दांत नाही, तर कृतीतून होते, त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्त्ीला समान वागनूक दिली आणि धाडस देऊन हिंदूत्वाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित केले.
यावेळी विक्रमसिंह आबिटकर, युवासेना प्रमुख विद्याधर परीट, उपसरपंच सागर शिंदे, शहर प्रमुख रणधिर शिंदे, साताप्पा कल्याणकर, बसरेवाडी माजी सरपंच संदीप पाटील, प्रशांत भोई, पांडूरंग कांबळे, विशाल वायदंडे, दयानंद आरेकर, परेश वाडेकर, युवराज सुर्वे,प्रशांत कांबळे, राकेश भोसले, प्रदिप चव्हाण, अजित वडर,पांडूरंग कांबळे, सणगर यांच्यासह प्रमुख मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.