कोल्हापूर –राजारामपूरी येथे कट्टर शिवसैनिक ग्रुपच्या वतीने 99 व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी बाळासाहेबांच्या फोटोला अभिवादन करून कोल्हापुरातील ५ जेष्ठ शिवसैनिक सुनील जोशी, बाळासाहेब निगवेकर, मोहन माजगांवकर, प्रसाद ब्रह्मपुरे, सुधाकर मोरे, संजय मंडलिक ह्या शिवसेनेच्या स्थापने पासून पक्षात सक्रिय असणाऱ्या व आजपर्यँत एकनिष्ठ आहेत. अश्या शिवसैनिकांचा ठाकरे परिवाराची फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला.
ह्यावेळी सुनील मोदी, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, गोविंद वाघमारे, विकी मोहिते सतीश माजगावकर, शिवाजी माने, शिवनाथ पावसकर, संतोष शेटे, जयदीप निगवेकर, आशिष मोरे, हर्षवर्धन शिंदे, निलेश पाटील, धनंजय यादव, अमित पै, प्रसाद पोवार, विशाल पाटील,विनय क्षीरसागर, वीरू सांगावकर,सागर कुंभार, आकाश खाडे, यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.