हिंदुत्ववादी संघटनांनी नेहमी एकजूट ठेवावी एकमेकाला सहकार्य करुन हिंदुत्वाचा प्रसार करावा : आ.चंद्रदीप नरके

कोल्हापूर : अयोध्या येथील प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सकल हिंदू समाज कोल्हापूर यांच्या मार्फत आनंद सोहळ्याचे आयोजन केले होते. भजन व महाआरती असे कार्यक्रम अत्यंत धार्मिक वातावरणात पार पडले. यावेळी चंद्रदीप नरके यांची आमदारपदी निवड झालेबद्दल सकल हिंदू समाजाने सत्कार केला. महायुती सरकार हिंदू समाजाच्या नेहमी पाठीशी आहे, महाराष्ट्रातील सर्व गड- किल्ले हे 31 मे 2025 पर्यंत अतिक्रमणमुक्त करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय हा त्याचच एक पाऊल आहे.

 

 

सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी नेहमी एकजूट ठेवावी एकमेकाला सहकार्य करुन आपल्या हिंदुत्वाचा प्रसार करण्याबरोबर प्रत्येक कार्यकर्ता स्वतःच्या पायावरती उभारला पाहिजे, सक्षम झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करुयात आम्ही सदैव पाठीशी आहोत अशी भावना यावेळी आमदार नरके यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला आमदार राजेश क्षीरसागर,मुकुंद भावे, महेश जाधव, विजय जाधव, पृथ्वीराज महाडिक, सुजित चव्हाण, बंडा साळुंखे, दुर्गेश लिंग्रस, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज संदेश देशपांडे,सरदार कमळोजी साळोखे यांचे वंशज सुहासदादा साळोखे, आशिष लोखंडे, रुपराणी निकम, सिद्धी रांगणेकर, आनंदराव पवळ, नितीन काकडे, उदय भोसले आदी उपस्थित होते.