कृषी साहित्याचा साहित्यीकांनी मसाल्यासारखा वापर करून घेतला आहे : भालचंद्र नेमाडे

मुंबई : साहित्य क्षेत्रातील ऋुषितुल्य व्यक्तीमत्व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांची मुंबई येथील निवासस्थानी राजू शेट्टी यांनी भेट घेतली. साहित्यीक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले लेखन हे अभूतपुर्व असून लेखनाच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्य जगताला नवे आयाम दिले.

 

 

वयाच्या ८५ व्या वर्षी सुध्दा प्रचंड उत्साह व काम करण्याच्या उमेदीमुळे आजही १४ ते १६ तास लिखाण व साहित्याच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे.भारत हा कृषीप्रधान देश आहे मात्र आपल्या देशात कृषी साहित्याचा साहित्यीकांनी मसाल्यासारखा वापर करून घेतला आहे. ख-या अर्थाने शेती , शेतकरी , शेतमजूर यांच्या व्यथा , वेदना व जीवनकार्य याबाबत परखड लिखाण होण्याची आवश्यकता आहे असे परखड मत नेमाडे यांनी व्यक्त केले.

या वयातही ते स्वत: दररोज लिखाण करतात. साहित्यामधील त्यांची संपत्ती ही त्यांच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे हे त्यांच्या कार्यावरून स्पष्ठ होते. मातृभाषांवरील इंग्रजीचे वाढते प्रस्थ, मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा, हिंदुत्व, साहित्य संमेलन अशा अनेक विषयांवर आपले परखड विचार मांडले.