राहुल पाटील यांच्या हस्ते बहिरेश्वर येथील आयोजित निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन

कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करवीर विधानसभा मतदारसंघातील बहिरेश्वर या गावी करण्यात आले होते.

 

 

या शिबिराचा प्रमुख उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांवर विविध संस्कारांचे धडे शालेय जीवनात घडावेत हा असतो.

या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून या शिबिराचे उद्घाटन राहुल पाटील यांनी केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला. यावेळी माझ्यासमवेत प्रमुख पाहुणे म्हणून मानसिंग बोंद्रे (दादा), वंदना दिंडे पाटील, प्राचार्य आर के शानेदिवाण ,आनंदा दिंडे, रघुनाथ वरुटे (बापू),आदी समवेत सर्व शिक्षक इतर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी आदी उपस्थित होते.
.