आ. अमल महाडिक यांची गोशिमा कार्यालयात उद्योजकांसमवेत बैठक

कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये आमदार अमल महाडिक यांची गोशिमा कार्यालयात उद्योजकांची बैठक संपन्न झाली. यावेळी उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. प्रामुख्याने वीजदर कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली.

 

 

उद्योजकांना उद्योग विस्तारासाठी नवीन भूखंड उपलब्ध करून देणे, वेळेत सबसिडी मिळणे, सेंटर ऑफ एक्सलन्स साठी निधी देणे अशा प्रमुख मागण्या उद्योजकांच्या आहेत. या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून शासन स्तरावर बैठक आयोजित केली जाईल तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून समस्यांवर तोडगा काढला जाईल असा विश्वास याप्रसंगी आमदार अमल महाडिक यांनी उद्योजकांना दिला.
यावेळी गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम, उपाध्यक्ष सुनील शेळके, सचिव संजय देशिंगे, खजानीस अमोल यादव, दीपक चोरगे, मंगेश पाटील, सत्यजित जाधव, राजवर्धन जगदाळे, रामचंद्र लोहार यांच्यासह अन्य उद्योजक उपस्थित होते.