पन्हाळा –
कै. विमल विलास लवटे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त कोतोलीत सर्व रोगशिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच उपसरपंच यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात आले. त्वचारोग तज्ज्ञ अपुर्व शिंदे, डॉ कौस्तुभ वाईकर मेंदू तज्ञ व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


लव्हटे कुटुंबांनी सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे माजी व्हा चेअरमन कोजिमाशी बॅक एस.डी.पाटील यांनी सांगितले.
यावेळी परिसरातील लोकांनी याचा लाभ घेतला यावेळी सरपंच वनिता पाटील, उपसरपंच अजित पाटील, सुभाष पाटील,मा. उपसरपंच सुवर्णा पाटील, दत्तात्रय चेचरे, संदीप चौगुले, अनिल गायकवाड,प्रकाश लव्हटे,
आधी सह पदाधिकारी उपस्थित होते. लव्हटे कुटुंबांनी सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला असल्याचे सागर लव्हटे यांनी सांगितले.
