मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुका होऊन दोन महिने लोटले. आता शासनाला लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे. त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.


लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन शासनाने तत्काळ पूर्ण करावे. छाननीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत. असे झाल्यास आम्ही राज्यात मोठे आंदोलन उभे करू असा इशारा हि त्यांनी दिला आहे.
