मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी रोजी दरवर्षी शिवसेना पक्षाच्या विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही ही परंपरा जपत शिवसेनेतर्फे ‘ शिवोत्सव ‘ साजरा करण्यात येणार आहे.
मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात आपण महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली. याचीच पोचपावती जनतेने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि महायुतीला दिली. जनतेने दिलेल्या या भरघोस मतरूपी आशीर्वादामुळे विजयी उत्सव साजरा करण्याकरिताबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मुंबईतील बीकेसी मैदान येथे सायंकाळी ६ वाजता शिवोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात शिवसेनेच्या सर्व विजयी खासदार, आमदारांचा भव्य नागरी सत्कार होणार आहे. त्याचबरोबर यावेळी सोनू निगम व अवधूत गुप्ते यांचा देखील सांगीतिक कार्यक्रम असणार आहे.