कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील जवान संदिप कृष्णात कणेरकर (रा. बोरपाडळे) यांना “सेनामेडल वीरता पुरस्कार” मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार खासदार धैर्यशील माने यांनी केला.
जम्मू-काश्मीर सरहद्दीवर २६ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ७ च्या सुमारास अतिरेक्यांनी अचानक हल्ला केला. यावेळी भारतीय लष्कराने आतंकवाद्यांच्या विरोधी ऑपरेशन राबवले. ५ अतिरेक्यांकडून ग्रेनेटद्वारा बेछूट गोळीबार करण्यात आला. जोराचा हल्ला सुरु असताना संदिप कणेरकर यांनी जीवाची पर्वा न करता प्राण पणाला लावत पुढे-पुढे जात ५ अतिरेक्यांशी झुंज दिली. यामध्ये एका खतरनाक आतंकवाद्याच्या खातमा केला…
जवान संदिप कणेरकर यांनी आपल्या अचूक नेमबाजीने, गोळीबाराने एका खतरनाक अतिरेक्याला संपवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. निडर धाडस, अनुकरणीय व तत्पर निर्णयक्षमता, युद्धनिती कौशल्य आणि शूरता पाहून त्यांना सेनामेडल वीरता [ग्यालेन्ट्री अवार्ड प्रदान करण्यात आला. १५ जानेवारी २०२५ रोजी नुकत्याच पुणे येथील ७७ व्या भारतीय सेना दिवस कार्यक्रमात आर्मीचे आर्मी चीफ ऑफ कमांडर उपेंद्र त्रिवेदी, जनरल मनोज मुकुंद नरवाने यांच्या हस्ते संदिप कणेरकर यांना गौरविण्यात आले.