दख्खनचा राजा जोतिबाचे चार दिवस दर्शन बंद

पन्हाळा –जोतिबा मूळ मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. या कारणाने जोतिबा देवाचे दर्शन चार दिवस बंद राहणार आहे.कोल्हापूरचं आराध्य दैवत म्हणजेच दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या मूळ मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे.

 

 

 

 

यामुळे भाविकांसाठी मंगळवार ते शुक्रवार असे चार दिवस देवाचे दर्शन बंद राहणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी या काळात देवाची उत्सवमूर्ती व कलश दर्शनासाठी कासव चौक येथे ठेवण्यात येणार आहे. मूळ मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागाला कळविले होते.

तर पुरातत्व विभागाने मूर्तीची पाहणी करून मूर्तीवर रासायनिक संवर्धन करण्याची सूचना केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मूर्तीची पाहणी देखील केलीय. जिल्हाधिकारी, गावकरी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारपासून मूर्तीवर रासायनिक संर्वधन प्रक्रिया करण्याचा निर्णय करण्यात आलाय.