पालकमंत्र्यांच्या नेमणुकीनंतर महायुतीत वादाची ठिणगी ; एकनाथ शिंदे नाराज!

मुंबई : नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री पद न मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी म्हणजेच दरे या गावी पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन दरे येथे जाणार असल्याचं सूत्राकडून समजत.

 

 

शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांना नाशिकचे पालकमंत्री पद तर भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. मात्र नाशिकचे पालकमंत्रीपद भाजप ने आपल्याकडे घेत रायगड मध्येही राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामुळे एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असल्याचे बोलले जात आहे.शिंदेंच्या नाराजी नंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी केलेल्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे.