शौमिका महाडिक यांनी दिल्या जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांच्या घरी भेटी

कोल्हापूर : गोकुळ दूध संघातर्फे दूध उत्पादकांना वितरित केल्या जाणाऱ्या पशुखाद्याचा दर्जा खालावत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. कागल तालुक्यातील कुरुकली, बानगे परिसरातील दूध उत्पादकांची 15 हून अधिक जनावरे गोकुळ दूध संघाचे पशुखाद्य खाल्ल्याने आजारी पडली. त्यातील पाच जनावरे दगावली. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शौमिका महाडिक यांनी जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांच्या घरी भेटी देऊन संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा सुन्न करणाऱ्या होत्या.

 

 

गोकुळ दूध संघाच्या प्रशासनाकडून होत असलेली हलगर्जी संताप जनक आहे, यावर आवाज उठवू शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास शौमिका महाडिक यांनी यावेळी दिला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गोकुळचे माजी संचालक विश्वास जाधव, हनुमान संस्थेचे संस्थेचे चेअरमन चंद्रशेखर सावंत, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी,डॉ.अमोल सावंत, सरपंच सुनिल बोंगार्डे, दत्तात्रय सावंत, रमेश सावंत, संताराम पाटील, राजाराम पाटील, बाबुराव पाटील, कुरूकली गावचे उपसरपंच गिरीष पाटील, संस्थेचे संचालक सुनिल बेलवळेकर, रणजित पाटील, गुलाब तिराळे, संस्थेचे सचिव सतीश तिराळे,डॉ.संजय म्हातुगडे,डॉ.आंनदा दाभोळे, पशुधन अधिकारी डॉ.विनोद मगदूम, बाळासाहेब चौगुले तसेच दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.