कुंभोज (विनोद शिंगे)
रुकडी (ता. हातकणंगले) या आचार्य रत्न 108 बाहुबली महाराज यांच्या जन्म गावी अष्टापद तीर्थ हे क्षेत्र प्रथम गणिनी प्रमुख आर्यीका 105 मुक्ती लक्ष्मी माताजी यांच्या प्रेरणेने निर्माण होत आहे. या क्षेत्रावरती 19 जानेवारी ते 25 जानेवारी अखेर पंचकल्याणीक प्रतिष्ठा महामहोत्सव सोहळा संपन्न होत असून,
या सोहळ्यासाठी सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष खासदार धैर्यशील माने व आमदार अशोक बापू माने यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना निमंत्रण दिले असून दोघांनीही सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
मुंबईतील त्यांच्या कार्यालयात श्रावक किरण पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना रीतसर निमंत्रण दिले असून दोघांनीही सोहळ्यास येणार असल्याचे मान्य केले असुन येत्या दोन दिवसात योग्य ती तारीख कळेल असे पाटील यांनी सांगितले.