कोल्हापूर : बुधवार 15जानेवारी रोजी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त खासदार महाडिक सहकुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. गेली कित्येक वर्षे वाढदिवसानिमित्त तिरुपतीला जाऊन व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्याची परंपरा यंदाही खासदार महाडिक यांनी कायम ठेवली. त्यांच्यासोबत पत्नी सौ. अरुंधती, मुलगा पृथ्वीराज, विश्वराज व कृष्णराज यांच्यासह दोन्ही सुना आणि नातू उपस्थित होते.
बुधवारी दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खासदार महाडिक यांना दूरध्वनीद्वारे आणि सोशल मीडिया वरून शुभेच्छा दिल्या. तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी सुद्धा खासदार महाडिक यांचे अभिष्टचिंतन केले. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुरमु, उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे खासदार महाडिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नामदार नितीन गडकरी, नामदार भूपेंद्र यादव, नामदार अश्विनी वैष्णव, ना. राम नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार रक्षा खडसे, उदयनराजे भोसले यांनी खासदार धनंजय महाडिक यांना दूरध्वनी द्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नामदार चंद्रशेखर बावनकुळे, नामदार चंद्रकांत दादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ यांच्यासह राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींनी खासदार महाडिक यांना वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या. शिवाय कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील कला- क्रीडा -उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी सोशल मीडियातून खासदार महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.