अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला !

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाल्याची खळबळ जनक बातमी समोर येत आहे. सैफ वर सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काल रात्री १० वाजता हा चाकू हल्ला अभिनेत्यावर झाला.

 

 

 

सैफ अली खान याच्या घरात घुसून एका अज्ञाताने हा हल्ला केला आहे . गेले काही दिवस तो चोर सैफ अली खानच्या घराची टेहाळणी करत होता. चोरीच्या उद्देशाने तो अज्ञात व्यक्ती अभिनेत्याच्या घरात शिरलेला पण त्याची चाहूल लागल्यामुळे घरामध्ये आरडा ओरड सुरू झाली.  सैफ रात्री झोपला असताना अचानक तो आवाज झाल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिलं. तेव्हा चोर आणि सैफ अली खान एकमेकांच्या समोरासमोर आले. त्याचवेळी चोराने सैफ अली खानवर चाकूने वार केले. हा प्रकार रात्री अडीचच्या सुमारास घडला. त्यानंतर जखमी झालेल्या सैफ ला ताबडतोब मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैफ जखमी झाल्यामुळे त्याला सावरण्यासाठी घरात धावपळ सुरू झाली या संधीचा फायदा घेत चोराने घरातून पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार सैफची मुलं ज्या खोलीत झोपलेली त्या खोलीत चोर उडी मारुन आला होता. चोराची चाहूल सैफच्या मुलांच्या नॅनीला झाली त्यामुळे तिन लगेचेच आरडाओरड सुरू केली. तेव्हा सैफला जाग आली आणि तो बाहेर आला. त्याक्षणी चोर आणि सैफ आमनेसामने आले. आपण पकडले जाऊ या भीतीने चोराने सैफवर हातात असलेल्या धारदार शस्त्राने वार करायला सुरुवात केली. यामध्ये सैफ बराच जखमी सुद्धा झाला आहे.