कुंभोज (विनोद शिंगे)
मनुष्य जीवनात अध्यात्माला एक विशेष महत्त्व असून प्रजापिता ब्रह्माकुमारी आध्यात्मिक केंद्राच्या माध्यमातून मनुष्य जीवनात धर्म संस्कार व त्याग या सर्व गोष्टींची शिकवण व प्रत्यक्षात आचरण करण्याचे मार्गदर्शन केले जाते त्यासाठी खऱ्या अर्थाने आज भारत देशाला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी अध्यात्मिक केंद्रांची गरज आहे. असे मत कुंभोज प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय उप सेवा केंद्राच्या प्रमुख शिल्पा बहिणजी यांनी बोलताना व्यक्त केले.
त्या कुंभोज तालुका हातकलंगले येथे मकर संक्रांति निमित्त आयोजित महिला हळदी कुंकू समारंभ प्रसंगी मार्गदर्शन देताना बोलत होत्या .यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या असिस्टंट मॅनेजर पदी निवड झाल्याबद्दल सुनीता वाईकर यांचा सत्कार शिल्पा बहिणजी व शिंगे परिवाराच्या वतीने करण्यात आला.
आज मनुष्य जीवन जगत असताना विज्ञानाच्या प्रगती बरोबर पुढे जात आहे. परंतु तो जीवन जगताना अध्यात्माला कुठेतरी विसरत आहे. त्यामुळे अनेक संकटे निर्माण होत असून मनुष्य जीवनात अध्यात्माला विशेष महत्त्व दिल्यास तो अनेक संकटांना समोर जाऊ शकतो असे आशियाचे मत उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक पत्रकार विनोद शिंगे व आभार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या असिस्टंट मॅनेजर सुनीता वाईकर यांनी मांनले यावेळी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन सुनीता वाईकर यांचा उपस्थित महिलांनी सत्कार केला.विनोद शिंगे कुंभोज