कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्रा तर्फे कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहासाचा प्रकल्प सुरु केला असून त्याचा पहिला खंड‘कोल्हापूर: ऐतिहासिक व प्राकृतिक’ या नावाने प्रसिद्ध केला जात आहे. कोल्हापूरच्या इतिहासाचा हा ब्रहृद् प्रकल्प असून त्याचे संपादन शाहू संशोधन केंद्राचे संचालक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले आहे. बुधवार, दि. १५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहात या ग्रंथाचे प्रकाशन ख्यातनाम साहित्यिक व विचारवंत प्रा. रंगनाथ पठारे यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
कार्यक्रमालाशाहू छत्रपती महाराज आणि डॉ. माणिकराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती आहे. ग्रंथाच्या पहिल्या विभागात इ.स. पूर्व ब्रह्मपुरी वसाहतीपासून कोल्हापूरच्या विलिनीकरणापर्यंतचा इतिहास ग्रथित
करण्यात आला आहे. दुसऱ्या विभागात कोल्हापूरचा भूगोल, वनस्पतिसंपदा, प्राणीसंपदा व पक्षीसंपदा या विषयांवर प्रकाश टाकणारे लेख आहेत. यानंतर ‘कोल्हापूर: सांस्कृतिक’, ‘कोल्हापूर: सामाजिक’ असे दोन ग्रंथ प्रकाशित होणार