कोल्हापूर : प्रत्येकांनी डिजिटल साक्षरता झाल्यास सायबर गुन्हे
टाळता येतील. त्यासाठी सायबर गुन्ह्याबाबत डिजिटल साक्षरता असणे आवश्यकआहे, असे प्रतिपादन अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख व सेबीचे नामिकासाधन तज्ञ प्रा.डॉ.विजय ककडे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात अर्थशास्त्र
विभागाच्या वतीने ‘ वित्तीय साक्षरता आणि सायबर क्राईम जनजागृती’ या
विषयावरील आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-
संचालक डॉ.कृष्णा पाटील होते. यावेळी उपकुलसचिव श्री.व्ही.बी.शिंदे उपस्थित
होते.
डॉ.ककडे म्हणाले की, सर्वांना वित्तीय साक्षरतेबाबत जनजागृती असली पाहिजे.
सायबर गुन्ह्या बाबत सर्वांनी दक्ष असणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना सुरक्षित गुंतवणूक करणे. गुंतवणुकीचे सर्व नियम व अटी माहीत असणे आवश्यक आहेत. गुंतवणूक परतावा जास्त आहे, म्हणून कोठेही गुंतवणूक करू नये. ती गुंतवणूक सुरक्षित जास्त व परतावा मागील तेव्हा मिळेल. याकडे पाहणे आवश्यक आहे.
आपण अर्थ साक्षरता असेल तर ऑनलाईन फसवणूक होणार नाही. जास्त
सुरक्षिततेसाठी मॅच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी. वाढत्या वयाबरोबर पैशातील रूपांतरमालमत्तेत जास्त असले पाहिजे. याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. असे डॉ.ककडे म्हणाले.स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश बेलीकट्टी यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रसाददावणे यांनी करून दिला. आभार डॉ. संजय चोपडे यांनी मानले.