शिक्षक  भरतीसंदर्भात कौस्तुभ गावडे यांचे मंत्री भुसे यांना निवेदन

कोल्हापूर : 
शिक्षक भरती तात्काळ सुरु होणेसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे  मुख्य्‍ कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी नुकतीच शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली.  शिक्षण  मंत्रालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने  मुंबई येथे महाराष्ट्रातील खाजगी शिक्षण संस्था प्रतिनिधी व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.  या प्रसंगी  संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे यानी शिक्षक भरतीसंदर्भातील निवेदन शिक्षण मंत्री दादा भुसे यांना देऊन खालील बाबी निदर्शनास आणून दिल्या.

 

1) पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती तात्काळ  सुरु करावी.

2) आनंददायी शिक्षण देण्यासाठी कला शिक्षक व क्रीडा शिक्षकांची भरती करणे आवश्यक असल्याचे सांगून त्या भरतीलाही परवानगी द्यावी.

3)  शिक्षकेतर कर्मचारी 50% बढतीने व 50% सरळ सेवा भरती करावी असा शासन निर्देश आहे परंतु शिपाई पदे लॅप्स केलेमुळे  100% कनिष्ठ लेखनिक भरणेस परवानगी मिळावी.

4) सध्या सर्व शिक्षण विभागाच्या मान्यतेचा अधिकार मंत्रालयाकडे आहे त्याऐवजी मान्यता जिल्हास्तरावर व्हाव्यात असे सुचविले.

या निवेदनाची दखल घेत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी तात्काळ शिक्षक भरती करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच पवित्र प्रणाली द्वारे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा तातडीने सुरु करण्यात येईल आणि शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीही सुरु करु असे जाहीर केले. त्यामुळे शिक्षण संस्थेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.  या प्रसंगी कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर, संस्थेचे सहसचिव प्राचार्य एस.एम.गवळी , संस्थेचे समन्वयक, श्री. शेखर कुलकर्णी उपस्थित होते.

🤙 9921334545