कुंभोज(विनोद शिंगे)
कुंभोजमधील गावठाण वाढ प्लॉटला भोगवटदार म्हणून महाराष्ट्र शासनाचे नाव असलेने सदर प्लॉटधारकांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नसलेने नागरिकांत तीव्र नाराजी आहे.. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदेश भोसले यांनी शिष्टमंडळासह हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मंत्री मुश्रीफ यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकीला उपस्थित राहण्यास शिष्टमंडळास सांगितले..
निवेदनात म्हटले की, कुंभोज (ता.हातकणंगले) येथील गायरान ग.नं.१७२६ व १८३१ मध्ये मा.उपविभागीय अधिकारी, करवीर विभाग कोल्हापूर यांचेकडील आदेश क्र गावठाण वशि/३६४८/१९७६ अन्वये १ ते 143 प्लॉट वाटप झाले आहेत. परंतु अद्याप सदर वाटप प्लॉटचे ७/१२ चे वसले तयार झालेले नाहीत. तरी सदर प्लॉट नं. १ ते १४३ चे प्लॉटचे वसले तयार करून ७/१२ उतारे मिळावेत.त्यामुळे कुंभोज ग्रामस्थांना शासकीय योजनेचा लाभ घेता येईल…
यावेळी मा.ग्रा.पं.सदस्य अरुण माळी, मा.ग्रा.पं.सदस्य सागर कांदेकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन भोसले, संभाजी माळी, विशाल पांडव, प्रकाश कांबळे, वृषभ भोकरे, मुरलीधर महाडिक, दिपक घोदे, तुकाराम शिंदे, पिराजी कोळी आदी उपस्थित होते