कुंभोज (विनोद शिंगे)
माजी मंत्री व मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या फंडातून विक्रम नगर बालाजी चौक ते रुग्गे मळा या परिसरातील रस्त्याच्या विकासकामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या प्रसंगी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या विकासकामामुळे परिसरातील रहिवाशांना चांगल्या सुविधा मिळणार असून वाहतुकीसाठीही सोयीस्कर रस्ता उपलब्ध होईल.