कुंभोज (विनोद शिंगे)
राष्ट्रीय चर्मकार महासंघ कोल्हापूर जिल्हा समस्त चर्मकार समाज शिरोळ तालुका यांच्याकडून हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने, रेखा अशोकराव माने व स्वीय सहायक सुहास राजमाने यांचा सत्कार शुभारंभ संपन्न झाला.यावेळी, समस्त चर्मकार समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी अशोक माने म्हणाले, बोलताना हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकरावजी माने यांनी चर्मकार समाजाने मला विधानसभा निवडणुकीत चांगले सहकार्य केले आहे. समाज व सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींनी केलेल्या सहकार्यामुळेच मी प्रचंड मताधिक्याने विजयी झालो परिणामी जनतेने माझ्यावरती ठेवलेले विश्वासाचे नक्कीच विकास कामांच्या रूपातून मी मतदार संघाचे सोने करेन असा विश्वास ही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.