कोल्हापूर : कसबा बावडा परिसरात पाच ते सहा इसम अंगावर चादर ओढून संशयास्पदरित्या फिरत असल्याचे फुटेज समाज माध्यमांमध्ये आले होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
त्यातच लाईन बाजार येथील जाधव पार्क मध्ये घरफोडी देखील झालेली आहे. परिसरात फिरणारे हेच इसम यामागे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाईन बाजार व कसबा बावडा परिसरात पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी आम आदमी पार्टीने शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
रात्रीचे गस्त वाढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी शहर महासचिव अभिजीत कांबळे, शहर सचिव समीर लतीफ व शहर संघटक विजय हेगडे उपस्थित होते.