कुंभोज येथे मुख्यमंत्री सडक योजनेचे उद्या अमल महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभोज  (विनोद शिंगे)
कुंभोज (ता.हातकणंगले) येथे सकलात साहेब पीर ते नरंदे हा जवळजवळ साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जवळजवळ अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून सदर कामाचे उद्घाटन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते शुक्रवारी दिनांक 10 रोजी सकाळी दहा वाजता सकलात पीर साहेब दर्गा कुंभोज येथे होणार आहे.

 

सदर रस्त्यामुळे कुंभोज नरंदे परिसरातील शेतकऱ्यांच्या वाहतुकीच्या महत्त्वाची समस्या निकली असून सदर रस्त्यावरून जवळजवळ 600 पेक्षा जास्त एकरातील ऊस व अन्य पिकांची वाहतूक होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारी मागणी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाल्याने कुंभोज सह नरेंद्र परिसरातील शेतकऱ्यांच्या आतून समाधान व्यक्त होत आहे.

सदर कार्यक्रमासाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकरावजी माने, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील ,छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश तांनगे अमित साजनकर ,कुंभोज ग्रामपंचायतच्या सरपंच सौ स्मिता चौगुले उपसरपंच अशोक आरगे,बलुपत कुलकर्णी ,जवाहर सहकारी साखर कारखान्याची व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत.

🤙 9921334545