कोल्हापूर – 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या अनुषंगाने कोल्हापूर येथे समादेशक डॉ. प्रशांत अमृतकर राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 16 कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली 2 ते 8 जानेवारी 2025 दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये हर्ष परेड, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शस्त्राचे प्रदर्शन, वाहतूक नियम माहिती, पोलीस बँड डिस्प्ले, व्हॉलीबॉल स्पर्धा, नंदवाळ वृक्ष संवर्धन मोहीम व आर्थिक साक्षरता मोहीम असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. देवी पार्वती विद्यालय वडणगे प्राचार्य श्री. देवणे व लिटील निमो स्कूल फुलेवाडी प्राचार्य श्रीमती जेनीफर डीसूझा यांनी मा. समादेशक डॉ. अमृतकर यांचे आभार मानले.
सर्व कार्यक्रमाकरिता सहा. समा. हिंगरूपे, सहा. समा. सदाशिव, पो. नि. जराड, पो. नि. मोरे, पो. नि. शर्मा, पीएसआय गेंगजे व इतर सर्व अधिकारी यांनी उपस्थिती दर्शविली.
तसेच पो. नि. लिपारे व पीएसआय अशोक गुजर यांनी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त वरील सर्व कार्यक्रमांचे नियोजन केले.