आ.राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत रोटरी ट्रेडफेअरची सांगता

कोल्हापूर:स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील केईटीपी ग्राऊंडवर २ जानेवारी ते ६ जानेवारी अखेर दैनिक महासत्ता व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्याने भरविण्यात आलेल्या रोटरी ट्रेडफेअरची सांगता आमदार राहुल आवाडे यांच्याउपस्थितीत पार पडली.

 

 

इचलकरंजी शहराच्या जडणघडणीत रोटरी क्लबचा फार मोठा वाटा आहे. कोणतेही राजकारण न करता, समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे कार्य रोटरी क्लब विविध सामाजिक उपक्रमांतून करीत आहे. गेली २४ वर्षे सातत्याने रोटरी ट्रेडफेअर भरवत असून, या माध्यमातून नवउद्योजकांना मोठा फायदा होत आहे. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्‌गार राहुल आवाडे यांनी काढले.

कार्यक्रमास रोटरीचे अध्यक्ष संतोष पाटील, फेअरचे चेअरमन मनीष मुनोट, शरद पै, अरुण भंडारी, पंकज कोठारी, अभय बळकटे, चंद्रकांत मगदूम, दैनिक महासत्ताचे दिलावर मोमीन, यतिराज भंडारी, स्वाती भंडारे, सन्मती पाटील, मनाली मुनोट, विठ्ठलराव डाके, श्यामसुंदर मर्दा, महेंद्र मुथा, नेमिनाथ कोथळे, सत्यनारायण धून, संजय खोत, विक्रम चूचडे, मंजू घायतिडक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते