इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार प्रदान सोहळा

कोल्हापूर : इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त शहरातील सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व वस्त्रोद्योग आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार प्रदान सोहळा रोटरी क्लब, दाते मळा, इचलकरंजी येथे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे, माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे व आमदार डॉ.राहुल आवाडे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.

पुरस्कारप्राप्त मानकरीः

रमाकांत वाळवेकर (उद्योजक), समीर नाईक (वस्त्रोद्योग), आर्यवर्धन नवाळे (क्रीडा) मारवाडी युवा मंच मिडटाऊन (सामाजिक), सरोजिनी नायडू विद्यामंदिर क्रमांक ४३ (शैक्षणिक), अश्विनी माळगे, ज्येष्ठ छायाचित्रकार छोटूसिंग राजपूत यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला माजी आमदार सुरेश हाळवणकर, आयुक्त ओमप्रकाश दिवटे, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, रवींद्र माने, अतुल आंबी, संतोष पाटील, प्रा. रोहित शिंगे, तसेच अनेक पत्रकार बांधव आणि नागरिक उपस्थित होते