पी. एन. साहेबांनी जोपासलेला काँग्रेसचा विचार पुढे नेण्यासाठी एकजुटीने काम केलं पाहिजे : सतेज पाटील

कोल्हापूर : काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील साहेबांच्या 72 व्या जयंतीदिनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अभिवादन केले.

 

पी. एन. साहेबांनी जोपासलेला काँग्रेसचा विचार पुढे नेण्यासाठी आपल्याला एकजुटीने काम केलं पाहिजे. हि विचारांची लढाई आपल्यालाच लढायची असून अशा प्रकारचा निर्धार आज साहेबांच्या जयंतीदिनी आपण करूया अशी भावना आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संजय बाबा घाटगे, के. पी. पाटील यांच्यासह राजेश पाटील, राहुल पाटील तसेच राष्ट्रवादीचे व्हि. बी. पाटील, शेकापचे बाबुराव कदम, कॉ. दिलीप पवार, कॉ. उदय नारकर, कॉ. सतीशचंद्र कांबळे, वसंतराव पाटील, डी. जी. भास्कर, भारतीताई पवार, विश्वास पाटील (आबाजी), बाळासाहेब सरनाईक, बाजीराव पाटील, राहुल देसाई, शिवाजीराव पाटील, धैर्यशील पाटील- कौलवकर, बी. के. डोंगळे, सदाशिवराव चरापले, सुधीर देसाई, युवराज पाटील यांच्यासह गोकुळचे सर्व संचालक, जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, बाजार समितीचे संचालक आणि इंडिया व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

🤙 8080365706