युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यावर जल्लोषी स्वागत

कोल्हापूर : गडहिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापुरे, माजी नगराध्यक्ष राजू खणगावे व करंबळीचे लोकनियुक्त सरपंच अनुप पाटील यांनी माझी वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा देऊन माझा सत्कार केला होता. या अश्वारूढ पुतळ्याचे सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी कार्यस्थळावर वाजत – गाजत मिरवणुक काढून मनोभावे पूजा करून कारखाना कार्यस्थळावरील दत्त मंदिरात प्राणप्रतिष्ठापना केली.

 

 

यावेळी माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर, करंबळीचे लोकनियुक्त सरपंच अनुप पाटील, मूर्तिकार श्रेयस कुंभार, कारखान्याचे चीफ इंजिनियर मोहन पोवार, को – जन मॅनेजर मिलिंद पंडे, लेबर ऑफिसर संतोष मस्ती, डब्ल्यू टी पी इन्चार्ज स्वप्निल कोटकर, ताहीर कोचरगी, श्रीनाथ मगदूम, अथर्व मिसाळ, निशांत हातरोटे, रजत दसुरकर, शुभम कुरणे, अपूर्व भद्रापुर, अक्रम जमादार, निहाल नदाफ, यांच्यासह कारखान्याचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.