कोल्हापूर : अब्दुललाट येथे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अब्दुल लाट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री अद्दाप्पा कुरुंदवाडे साहित्य नगरीत 52 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाच्या उदघाटन मंत्री हसन मुश्रीफ व माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,सरपंच कस्तुरी कुरुंदवाडे, डॉ.दशरथ काळे सर,लाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ.अरुण कुलकर्णी,ज्येष्ठ साहित्यिक अदाप्पा कुरुंदवाडे,प्राचार्य डॉ देवेंद्र कांबळे,पंचायत समितीचे माजी सदस्य बंडोपंत कुलकर्णी,माजी मुख्याध्यापक के.बी.गडकरी,डॉ.कुलकर्णी, प्रा.डॉ.कांबळे,पंचायत समितीचे कुलकर्णी,पालक विद्यार्थी आणि विविध शाळांचे हायस्कूलचे विद्यार्थी प्रदर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.