कोल्हापूर : काँग्रेसचे शिरोळ तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने काँग्रेसने एक कुशल संघटक आणि कृतीशील कार्यकर्ता गमावला असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी म्हंटल.


शिरोळ तालुक्यातील विविध घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तालुक्यातील काँग्रेसच्या बळकटीसाठी त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील. आज सतेज पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आणि त्यांना आदरांजली वाहिली. या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी कुटुंबियांना धीर दिला.
