नववर्षाचा संकल्प – दुर्गराज रायगड प्लास्टिक मुक्त करण्याचा : छत्रपती संभाजीराजे

पुणे : रायगड हा आपल्या स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे.मात्र, मागील काही वर्षांपासून गडावर येणाऱ्या शिवभक्त, पर्यटक, आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही आनंदाची गोष्ट असली तरी त्याचा परिणाम गडावर प्रचंड प्रमाणात प्लास्टिक कचरा साचण्यात झाला आहे. यामुळे गडाच्या स्वच्छतेला आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होत आहे.

 

 

प्लास्टिकचा वापर टाळा:
प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या याऐवजी पुनर्वापर करता येणारे साहित्य वापरा.

स्वच्छता राखा :
गडावर कचरा साचू देऊ नका. शक्य असल्यास, आपण तयार केलेला कचरा खाली घेऊन जा.

जागरूकता निर्माण करा:
इतर शिवभक्त आणि पर्यटकांमध्ये प्लास्टिक मुक्त गडाचे महत्त्व समजावून सांगा.

स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी व्हा:
गडाच्या स्वच्छतेसाठी आयोजित स्वच्छता उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवा.

 

🤙 9921334545