कुंभोज (विनोद शिंगे)
महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने इचलकरंजी विधानसभेचे आमदार डॉ. राहुल आवाडे यांना बांधकाम कामगाराच्या विविध मागण्याचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. सदर निवेदनामध्ये इचलकरंजी सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे यांनी पदभार स्वीकारल्यापासून सर्वच बांधकाम कामगाराची पेंडिंग कामे निकाली काढली नाहीत. तसेच बांधकाम कामगाराचे नवीन नोंदणीचे व विविध भागाचे अर्ज केली.


अनेक महिन्यापासून पेंडीग आहेत सदरच्या बांधकाम कामगारांची पेंडीग कामे लवकरात लवकर निघाली काढावी व बांधकाम कामगारांना विविध लाभाच्या लाभ ताबडतोब मिळावा शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील बांधकाम कामगारांना भांडी संच व पेटी वाटप इचलकरंजी मध्ये करण्यात यावेळी तसेच ज्याप्रमाणे बांधकाम कामगाराची ऑनलाईन कामकाज पूर्वीप्रमाणे चालू होते. ते बंद करून फक्त तालुक्यामध्ये एकच सेतूचे कार्यालय चालू करून सदरच्या कार्यालय मध्ये बांधकाम कामगाराचे सर्वच ऑनलाईन कामकाज चालू आहे. त्याच पद्धतीने इचलकरंजी शहरांमध्ये देखील बांधकाम कामगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे तरी इचलकरंजी शहरांमध्ये देखील बांधकाम कामगाराचे ऑनलाईन कामकाज चालू करावे व बांधकाम कामगाराच्या तपासाधिकारी किरकोळ किरकोळ त्रुटी काढून बांधकाम कामगारांना त्रास देत आहेत ते ताबडतोब बंद करण्यात यावा अशा अनेक मागण्या कामगार आयुक्त भोईटे यांना भेटून व निवेदन देऊन आंदोलन करून मागणी केली.
तरीदेखील इचलकरंजीचे सहाय्यक कामगार आयुक्त सो भोईटे मॅडम या कामगाराच्या मागण्याकडे दुर्लक्ष करतात व तपास अधिकाऱ्यांना कोणत्याही सूचना देत नाहीत त्यामुळे केल्या अनेक महिन्यापासून बांधकाम कामगाराचे सर्वच काम पेंडिंग असल्याने बांधकाम कामगारांचे नुकसान होत आहे एकीकडे शासन बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या योजना जाहीर करते पण इचलकरंजीचे सहाय्यक कामगार आयुक्त सो भोईटे ह्या जाणून-बुजून बांधकाम कामगाराच्या मागण्याकडे दुर्लक्ष करतात तरी तीन तारखेपर्यंत बांधकाम कामगाराच्या पेंडिंग कामाबाबत निर्णय झाल्यास तीन तारखेला सर्वच बांधकाम कामगार सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास टाळ्या ठोक आंदोलन करेल अशा अनेक मागण्या सदरच्या निवेदनामध्ये आमदार आवडी यांच्याकडे करण्यात आल्या.
निवेदन देतेवेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा संघटक सद्दाम मुजावर जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख तालुका उपाध्यक्ष अल्ताफ मुजावर महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा बेगम नदाफ जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका उपाध्यक्षा शाहीन खानापुरे शहापूर गाव अध्यक्ष सुमित्रा टोणे वसंत टपरे सलीम खानापुरे समीद टोणे दादासो तळे सुशांत कोण गिरी इत्यादी बांधकाम कामगार उपस्थित होते.
