महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबविणार : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : प्रत्येक क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढावे, महिला पुढे याव्यात, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विविध योजनांवर भर दिला आहे. याच अनुषंगाने खानापुर-गारगोटी येथे सरस्वती गारमेंट सेंटर सुरू करण्यात आले आहे. या गारमेंट पार्कच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थितीत उपस्थित राहिले.

 

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने”ने महिलांची ताकद दाखवून दिली आहे. बचतीची आणि कष्टाची चांगली सवय असलेल्या महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिल्यास त्या अधिक सक्षम होतील. कारण महिला स्वावलंबी झाल्या तरच कुटुंब सक्षम बनते. यामुळे महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी भविष्यातही अनेक विविध उपक्रम राबविणार असल्याची ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.

यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर जी यांसह अंजली पाटील, प्रविणसिंह सावंत, विद्या सावंत, सरपंच शोभा गुरव, प्रा. सुनील मांगले, दिनकरराव मगदूम, बी. डी. भोपळे, क्रांती मांगले, दत्तात्रय पाटील, उत्तम पाटील, अभिषेक मांगले, सदाभाऊ सोरटे, राजश्री मांगले, उत्तम पाटील, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते.

🤙 8080365706