आ.विनय कोरेंच्या हस्ते साजणी येथील वैष्णवी पेट्रोल पंपाचे उद्घाटन

कुंभोज ( विनोद शिंगे)

साजणी (ता.हातकणंगले) येथे सरपंच डॉ.राजू मगदूम व मगदूम परिवाराने नव्याने सुरू केलेल्या वैष्णवी पेट्रोलिंक्स या पेट्रोल व डिझेल विक्री पंपाचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर),माजी आमदार प्रकाश आण्णा आवाडे व इचलकरंजी विधानसभेचे आमदार राहुल प्रकाश आवाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 

 

यावेळी इचलकरंजी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा किशोरी प्रकाश आवाडे ,हातकणंगले विधानसभेचे आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने ,जयसिंगपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्षा डॉ.निता माने,प्रांताधिकारी समीर शिंगटे,उद्योगपती धनंजय टारे,साजणी गावचे सरपंच शिवाजी पाटील,आप्पासो उर्फ महावीर मगदूम ,चंद्रकांत उर्फ पिंटूदादा मगदूम यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545