पँगॉन्ग त्सो येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अनावरण

मुंबई : पँगॉन्ग त्सो येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अनावरण करण्यात आले.

 

२६ डिसेंबर २०२४ रोजी लेह-लडाखमधील पँगॉन्ग त्सो सरोवराच्या किनारी, समुद्रसपाटीपासून १४,३०० फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा अनावरण करण्यात आला.

अखंड शौर्य, दूरदृष्टी आणि न्यायाचे प्रतीक असलेल्या या स्मारकाचे अनावरण लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला, एससी, एसएम, व्हीएसएम, जीओसी फायर अँड फ्युरी कोर्प्स, व मराठा लाइट इन्फंट्रीचे कर्नल यांच्या हस्ते झाले.

या ऐतिहासिक स्मारकामुळे छत्रपतींच्या महान परंपरेचे स्मरण होईल, तसेच भारतीय सैन्याला प्रेरणा व आत्मविश्वासाचा नवा उर्जा स्रोत मिळेल.

🤙 9921334545