कोल्हापूर: युवकांच्या प्रेरणास्थान युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक ३५ यादव नगरच्या विकासासाठी महत्वपूर्ण निधी मंजूर झाला.
खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी यादव नगर प्रभाग क्रमांक ३५ अंतर्गत शेवाळे घर ते श्रीराम मंडळ, काळमाडे घर ते आंबी घर, राजपूत घर ते जतराटे घर, सोनुले घर ते जमादार घर, विजापुरे घर, महाबरी ते चौधारी घर, चव्हाण घर ते दाभोळकर घर, गाजवे घर ते अंबूसकर घर, चिले घर ते सरकारी शौचालय, तसेच साळोखे घर व लोहार घर परिसर, गणपती मंदिर ते श्रीराम मंडळ यांसारख्या विविध ठिकाणी गटार बांधकामासाठी २५ कोटी निधीच्या प्रकल्पातून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या महत्वपूर्ण कार्यक्रमात विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन प्रेमसिंग रजपूतजी, रविकिरण गवळीजी, सुरज पाटीलजी, संदिप साठेजी, नितीन पाटीलजी, अभिषेक सूर्यवंशीजी, नागेश पोवारजी, अर्जुन दिंडेजी, निलेश पाटीलजी, सत्यम चौगुलेजी, रणजित औंधकरजी, चौधरीभाई मुजावरजी, शिवराज रजपूतजी, मंगलताई निपाणीकरजी, साजिद मुल्लाजी, पप्या पाटीलजी यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निधीमुळे यादव नगर परिसरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावेल आणि स्थानिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मोठी मदत होईल. हा उपक्रम भागाच्या समृद्ध व सुनियोजित विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरला आहे.