कुंभोज (विनोद शिंगे)
कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र चंद्रकांतदादा पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच ते भारतीय जनता पक्षाच्या नागाळा पार्क येथील कार्यालयात आले.
यावेळी माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे व आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि स्वागत केले.
मान्यवरांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी संपूर्ण पाठिंबा देण्याची भावना व्यक्त करण्यात आली.