जैन समाज साजणी येथे सभागृहाच्या स्लॅपचा शुभारंभ-आ.राहुल आवाडे

कुंभोज  (विनोद शिंगे)
माजी मंत्री मा. आमदार  प्रकाशआण्णा आवाडे व आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2023-24″ अंतर्गत साजणी येथील सहस्त्र फणी पार्श्वनाथ दिगंबर जैन समाज साजणी येतील नवीन सभागृहाच्या पहिल्या मजल्याच्या स्लॅपचे शुभारंभ कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक रुई गावचे मा सरपंच अभयसिह काश्मिरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

तसेच जवाहर साखर कारखाना संचालक पदी तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ही कमिटीच्या वतीने करण्यात आला

यावेळी प्रमुख पदाधिकारी व साजणी तील श्रावक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545